अकोला / नगर सह्याद्री सध्या बिबट्या मानवी वस्तीमध्ये घुसण्याचा व हल्ला करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. आता आणखी एक थरार समोर आला आहे . अको...
अकोला / नगर सह्याद्री
सध्या बिबट्या मानवी वस्तीमध्ये घुसण्याचा व हल्ला करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. आता आणखी एक थरार समोर आला आहे.
अकोला शहरालगतच्या हिंगणा परिसरात बिबट्याने भोला जाधव नामक मजुरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्याने नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्याचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्या परिसरातील घरांमध्ये फिरत असून, भोला यादव(६५) नामक मजूर व राकेश राजभर(३०) यांचा पाठलाग करीत बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
यासोबतच बिबट्याने आणखी दोन युवकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही कॅमऱ्यातून दिसत आहेत.
COMMENTS