नगर सह्याद्री टीम सामूहिक हत्याकांड झालय, अनेक लोक मरून पडलेत असा कॉल पोलिसांना आला. पोलीस धावतपळत शवनपथक घेऊन घटनास्थळी आले. परंतु ते घ...
नगर सह्याद्री टीम
सामूहिक हत्याकांड झालय, अनेक लोक मरून पडलेत असा कॉल पोलिसांना आला. पोलीस धावतपळत शवनपथक घेऊन घटनास्थळी आले. परंतु ते घटनास्थळी येताच त्यांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली.
कारण तेथे योगा सुरु होता. व सर्व लोक शवासन करत होते. परंतु तेथे असणाऱ्या एकाला हे शासन करत आहेत याची कल्पनाच नव्हती. बराच वेळ कुणीच हालचाल करेन त्यामुळे त्याने थेट पोलिसांना कॉल केला.
सदर घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. अधिक माहिती अशी की, कॉल आल्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी एका हॉलमध्ये अनेक जण शवासनात डोळे मिटून शांत पडून असल्याचं पोलिसांनी पाहिलं. सगळे जण सुरक्षित असून सामूहिक हत्याकांडासारखी कोणतीच घटना घडली नसल्याची खात्री पटताच लिंकनशायर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
आम्हाला आलेला कॉल चांगल्या हेतूनं करण्यात आला होता. पण सुदैवानं तिथे तसं काही घडलेलं नव्हतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. योग शिक्षिका मिल्ली लॉज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीस्केप कॅफेत सात जण योग करत होते.
हा कॅफे इमारतीच्या आत आहे. सगळे जण शवासनात असताना कुत्र्यांना फिरवायला घेऊन आलेल्या काहींनी खिडकीतून आत पाहिलं. तेव्हा लाईट गेली होती. आत अंधार होता. माझ्याकडे केवळ मेणबत्ता होत्या.
त्यांच्याच प्रकाशात योगासनं सुरू होती. डोकावून पाहणारे काही सेकंदांत निघून गेले. मी त्यांचा फार विचारही केला नाही. पण पोलीस आल्यानंतर या सगळ्याचा उलगडा झाला असल्याचं लॉज म्हणाल्या.
COMMENTS