पिंपरी जलसेनमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ पारनेर | नगर सह्याद्री सध्या राज्यामध्ये व केंद्रामध्ये भाजप व महायुतीचे सरकार असून भाजपाचे ने...
पारनेर | नगर सह्याद्री
सध्या राज्यामध्ये व केंद्रामध्ये भाजप व महायुतीचे सरकार असून भाजपाचे नेते विश्वनाथ कोरडे यांच्याकडे निधी खेचण्याची कला आहे. त्याच्या पाठपुरव्यामुळे ३.७५ कोटींची विकासकामे मंजूर झाली असल्याचे प्रतिपादन माजी सभापती काशिनाथ यांनी केले.
तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील लेखाशीर्ष २५ /१५ अंतर्गत भागचंद सोनवणे घर ते रोकडोबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे - १५ लक्ष,कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जि.प.जलसंधारण समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, युवा नेते सचिन वराळ, भाजप माजी तालुका प्रमुख वसंत चेडे, सरपंच शिवाजी खिलारी, दत्ता पवार, संजय मते, अक्षय गोरडे, कृष्णाजी बिडवे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी सभापती दाते म्हणाले की, मी सामाजिक काम करणारा राजकीय कार्यकर्ता, लोकांच्यात काम करणारा आहे. तालुक्यात ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास कामे चालू आहेत. मी पक्ष प्रवेश केला नाही परंतु विकास कामे करण्यासाठी खा. सुजय विखे बरोबर काम करतो आहे. हे काम विश्वनाथ कोरडे यांच्या सततच्या पाठपुरव्यामुळे मंजूर झाले आहे. खासदार सुजय विखें यांनी कुठलाही विचार न करता पक्षात नसतानाही माझ्या शिफारशींची अनेक कामे मंजूर केली.
यावेळी सरपंच सुरेश काळे,उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, भ्रष्टाचार जनआक्रोश संघटना जिल्हा संपर्कप्रमुख भानुदास साळवे, सीताबाई कदम, अभिमन्यू थोरात, ग्रापं सदस्य मीनाक्षी थोरात, हिरामण थोरात, अरुण कदम, गंगाराम काळे, किशोर शेळके, संतोष थोरात, आनंदा रणदिवे, गुलाब थोरात, माऊली थोरात, लक्ष्मण बोर्डे, आश्रफ शेख, दगडू बोरुडे, निवृत्ती थोरात, ताराबाई कदम, नंदा काळे, कविता बोरुडे, उषा वाढवणे, शैला रणदिवे, जयवंत थोरात, राजू काळे, गोविंद वाढवणे, रामदास बोरुडे, लाला साळवे, सलीम पठाण, गोरख पवार, गणेश शेळके, लक्ष्मण बोरुडे, सखाराम थोरात, चांदभाई पठाण, नागेश साळवे, उद्धव साठे, सखाराम साळवे, रामदास साळवे, बाळू साळवे, दादाभाऊ साळवे इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब यांनी केले तर आभार माऊली थोरात यांनी मानले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत करोडो रुपये आले आहेत. भाजप सरकारच्या योजनेचा निधी गावापर्यंत जातो, मध्ये कुठलाही हस्तक्षेप होत नाही. प्रत्येक गावाला या निधीचा फायदा व्हावा हा उद्देश केंद्र सरकारचा आहे. तालुक्याच्या विकासात कोरडेंचे योगदान मोठे आहे. काम मंजूर करण्याची चिकाटी त्यांच्यात आहे. या कामाचे सर्व श्रेय त्यांचेच आहे.
- राहुल पाटील शिंदे, सदस्य, जलसंधारण समिती जि. प. अहमदनगर
COMMENTS