पुणे / नगर सह्याद्री महावितरण अधिकाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या खुनाला अनैतिक संबंधाचा वाद का...
पुणे / नगर सह्याद्री
महावितरण अधिकाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या खुनाला अनैतिक संबंधाचा वाद कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
गोपाळ कैलास मंडळे (वय ३२, रा. ओवी अंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा) असं खून झालेल्या तरुणचे नाव आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात ही घटना घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर या संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
समजलेली अधिक माहिती अशी : महावितरणमध्ये गोपाळ मंडळे हे वरिष्ठ वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होते. त्यांची महावितरणच्या सिंहगड रोड विभागात नेमणूक होती. मागील चार वर्षांपासून मंडळे हे रायकर मळा येथे पत्नी, मुलगा, आई यांच्यासोबत वास्तव्यास होते.
मांडवकर याचे नात्यातल्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मंडळे यांना होता. त्यातून दोघांचा वाद झाला होता. तो वाद मिटवण्यासाठी दोघे एकत्र खंडोबा मंदिर रोड परसिरात आले असताना, परत त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी मांडवकर याने चाकूने मंडळे यांच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने मंडळे यांचा जागीच मृत्यू झाला.
COMMENTS