बंगळुरू / नगर सह्याद्री : बऱ्याचदा अनेक आश्चर्यकारक गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात. आता अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. कर्नाटकची राज...
बंगळुरू / नगर सह्याद्री : बऱ्याचदा अनेक आश्चर्यकारक गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात. आता अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये ५५ बॉल अजगर, १७ किंग कोब्रा आणि ६ कॅपुचिन माकडं जप्त करण्यात आली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यातील अजगर आणि कोब्रा जिवंत असून माकडं मृतावस्थेत सापडली आहेत.
एका रिपोर्टनुसार बँकॉकहून एअर एशियाच्या विमानानं एक प्रवासी बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बंगळुरु विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे असलेलं सामान तपासलं. त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये ७८ प्राणी होते.
त्यात विविध रंगांच्या ५५ अजगरांसह १७ किंग कोब्रांचा समावेश होता. हे प्राणी जिवंत स्थितीत सापडले. पण ६ कॅपुचिन माकडं मृतावस्थेत आढळली. जिवंत अवस्थेत असलेल्या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आलं असून मृतावस्थेतील प्राण्यांची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
COMMENTS