अहमदनगर / नगर सह्याद्री चालत्या वाहनांना अचानक आग लागण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून असाच एक थरारक प्रसंग घडल्या...
अहमदनगर / नगर सह्याद्री
चालत्या वाहनांना अचानक आग लागण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून असाच एक थरारक प्रसंग घडल्याचे समोर आले आहे.
पुणे येथून मनमाड करिता चाललेली लाल परी..रात्री प्रवासी झोपेत असताना बसचा टायर पेटला... काही क्षणातच गाडीला आग लागल्याचे चालकाच्या अन् वाहकाच्या लक्षात आले..प्रसंगावधान राखत दोघांनीही त्वरित प्रवासी खाली उतरवले अन मोठा अनर्थ टळला.
अधिक माहिती अशी की : पुणे मनमाड ही बस पुण्याहून मनमाडकडे जात असताना नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी निर्मळ हद्दीत असताना मागील टायरला रात्री अडीचच्या सुमारास आग लागली.
टायरने पेट घेतला. बस मधील अनेक प्रवासी झोपलेले होते. बस चालकाच्या आग निदर्शनास आली. त्यांनी त्वरित बस कडेला थांबवत प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले.
त्यांनी ही घटना दूरध्वनीवरून राहाता नगरपालिकेचे अग्निशामन विभाग प्रमुख अशोक साठे व त्यांच्या सहकार्यांना कळवली. त्यांनी घटनास्थळी येत बसची आग आटोक्यात आणली. त्यामुळे बस तर वाचलीच परंतु होणारी मोठी दुर्घटना देखील टळली.
COMMENTS