जालना / नगर सह्याद्री : जालन्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध सध्या महाराष्ट्रभर आहे. आता भाजप खा...
जालना / नगर सह्याद्री :
यावेळी त्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. यावेळी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राजे तुम्ही सांगितलं तर मी आंदोलन मागे घेईन, घरी जाईन, असं उदयनराजे यांना म्हटले. यावेळी उदयनराजे यांनी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे.
मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. पण चर्चेशिवाय गोष्टी सुटणार नाहीत, असं उदयनराजे भोसले म्हणाले. ते यावेळी म्हणाले की, आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल माझी भेट झाली. या दोन-तीन दिवसातच चर्चा करुन लवकरात लवकर आंदोलकांची भेट घालून देऊ.
एक-दोन नाही तर 57 महामार्चा झाले पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पण त्याचा असा अर्थ नाही की मराठा समाज सहन करतो म्हणून प्रतिक्षा करावी. इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं. मी तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देईन असे ते म्हणाले.
COMMENTS