अहमदनगर | नगर सहयाद्री तीन दिवसांपूर्वी नगर शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या कुठे गेल्या? त्यांच्यासोबत काय घडले? आदी प्रश्न स...
सविस्तर माहिती अशी, की मंगळवारी एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली शहरातून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. या तिघींच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. तपास सुरू असतानाच पोलिसांना या मुली हैदराबादला त्यांच्या काकांकडे असल्याचे कळाले.
मुलींना ताब्यात घेतल्यानंतर जे समजले ते धक्कादायक होते. त्यांच्यावर जी आपबिती गुजरली ती भयाण होती. १२ सप्टेंबरला तीनही मुली शाळेत जाते असे सांगून बाहेर पडल्या. परंतु त्या शाळेत न जाता मित्रांसोबत डोंगरगणला फिरायला गेल्या.
फिरुन आल्यानंतर या मुली घरी न जाता सिद्धीबाग येथे थांबल्या. मित्रांनी घरी जाण्याची विनंती करूनही त्या घरी गेल्याच नाहीत. त्यांनी या मुलांना घरी जायची भीती वाटते, आमची राहण्याची सोय करा असे सांगितले. मित्रांनी त्यांना ते शक्य नसून घरी जाण्यास सांगितले.
या दरम्यान आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश एकनाथ हापसे (रा. उमरे, ता. राहुरी) हा कारमधून तेथे आला. मी चाइल्ड लाइनचे काम करतो असे सांगून यातील पिडीत मुलींना तो राहत असलेल्या भाडोत्री खोलीत घेऊन गेला. यातील तीन मुलीपैकी दोन मुलीसोबत शरीरसंबंध केले. त्यानंतर त्यांना पैसे देऊन रेल्वेने हैद्राबाद येथे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
आणखी लोक सहभागी असण्याची शक्यता?
मुली फिरून आल्यानंतर त्या जेथे उभ्या होत्या तेथे आरोपी कसा पोहोचला? आरोपीने त्यांना रूमवर नेल्यानंतर त्याच्यासोबत तेथे आणखी कुणी होते का? पीडित मुलींनी आरोपीचे म्हणणे ऐकून हैदराबाद कसे गाठले? यात मुलींच्या जवळचे कुणी सहभागी होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.
COMMENTS