निघोज | नगर सह्याद्री निघोज येथील दहीहंडी उत्सव पहाण्यासाठी मंळगंगा मंदीर परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तब्बल पाच थर...
निघोज | नगर सह्याद्री
निघोज येथील दहीहंडी उत्सव पहाण्यासाठी मंळगंगा मंदीर परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तब्बल पाच थरांवर ठेवलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचा आविष्कारनीय थरार पाहून उपस्थित अचंबित झाले.
पिनुभाउ वराळ मित्र मंडळ भव्य दहिहंडी महोत्सवासाठी ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस या वेळी ठेवण्यात आले होते. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, सुनिती ज्वेलर्सचे मालक गणेश कटारिया, माऊली मंळगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष माऊली तनपुरे यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आले होते.
संघर्ष मित्र मंडळ, साईधाम मित्र मंडळ, ढवणवाडी मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ यांच्या सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास हा गोविंदाचा थरार पहात ग्रामस्थ या ठिकाणी होते. यामध्ये संघर्ष मित्र मंडळाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवीत बक्षीसांचे मानकरी ठरले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, संघर्ष मित्र मंडळ, मंळगंगा युवा साईधाम गणेश मंडळ व ग्रामस्थ यांनी या वेळी परिश्रम घेऊन हा दहीहंडी महोत्सव यशस्वी केला आहे.
COMMENTS