अहमदनगर / नगर सह्याद्री चोरीची मोटारसायकल विक्री करणाऱ्या दोघांच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गजाजन हिलालसिंग मोरे (वय-२०...
अहमदनगर / नगर सह्याद्री
चोरीची मोटारसायकल विक्री करणाऱ्या दोघांच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गजाजन हिलालसिंग मोरे (वय-२० वर्षे, रा. गणपती कॉम्प्लेक्स मागे रांजणगांव जि पुणे) व देवेंद्र विजेंद्र सपकाळे (वय-२१ वर्षे, रा. गणपती कॉम्प्लेक्स मागे रांजणगांव जि पुणे) या दोघांना पोलिसांनी केडगांव बायपास चौकातून ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी : १२ सप्टेंबर २०२३ रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, केडगांव बायपास चौकात दोन इसम हे विनाक्रमांकाची मोटारसायकल विक्री करण्याकरिता आणणार आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे दोन इसम हे एका काळया रंगाच्या हिरो पॅशन प्रो मोटारसायकलवर संशयास्पद थांबलेले दिसले.
पोलिसांची चाहूल लागताच ते दोघेही पळून जायला लागले. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. सदर मोटारसायकलचे कोणतेही कागदपत्र नसून एका अनोळखी इसमाने सदरची मोटारसायकल आम्हांला अहमदनगरमध्ये टी पॉईटवर विक्री करण्याकरिता दिल्याचे सांगितले.
त्या दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, अतुल काजळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS