भुसावळ / नगर सह्याद्री एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दोन संख्या भावांसह एका कुविख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शांतारा...
भुसावळ / नगर सह्याद्री
एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दोन संख्या भावांसह एका कुविख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे असे मृत भावांचे नाव आहे.
तर कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याचाही खून करण्यात आला आहे. सदर घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात घडली आहे. शुक्रवारी (ता. १) रात्री या घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत मिळालेली माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे या दोन सख्ख्या भावांवर अज्ञातांनी चाकूने व तलवारीने वार केले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर हा प्रकार घडल्यानंतर काही तासाच्या आतच श्रीराम नगर परिसरात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याच्यावर अज्ञातांनी वार केले. निखिल राजपूतच्या गळ्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS