अहमदनगर / नगर सह्याद्री जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना वारंवार वाढताना दिसत आहेत. नुकतेच एक वृत्त हाती आले आहे. नागापुरातील लामखेडे चौकात एका य...
अहमदनगर / नगर सह्याद्री
जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना वारंवार वाढताना दिसत आहेत. नुकतेच एक वृत्त हाती आले आहे. नागापुरातील लामखेडे चौकात एका युवकावर शस्त्राने सपासप वार करण्यात आले आहे.
सदर घटना मंगळवारी (दि. 5) रात्री 11 वाजता नागापुरातील घडली. विनोद राजेंद्र तिजोरे (वय 24 रा. शासकीय दूध डेअरी जवळ, शेंडी बायपास, ता. नगर) असे जखमी युवकाचे नाव असल्याचे समजते.
तिजोरे हे मंगळवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून नागापूरच्या लामखेडे चौकातून जात असताना त्यांना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडवले. दुचाकीला लाथ मारून खाली पाडले.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धारदार हत्याराने पाठीवर वार केले. शिवीगाळ करत,‘तू परत लामखेडे चौकाकडे आला तर तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून धमकी दिली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS