चिचोंडी पाटील | नगर सह्याद्री नगर तालुयातील दश्मीगव्हाण येथील ग्रामसेवक आठवडाभरापासून गायब असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक ...
चिचोंडी पाटील | नगर सह्याद्री
नगर तालुयातील दश्मीगव्हाण येथील ग्रामसेवक आठवडाभरापासून गायब असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक दहा ते पंधरा दिवस येत नसल्याने नागरिकांनी दाद मागायची कुठे हा प्रश्न उपस्थित झाला असून ग्रामपंचायतीचे अनेक कामे रखडली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
दश्मीगव्हाण येथील विवाह नोंद करण्यासाठी ग्रामसेवकांना सुमारे आठ दिवसापासून फोन लावूनही ग्रामसेवक कार्यालयास्थळी हजर झाल्या नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर पीडीएफ पाठवत तुम्ही कार्यालयातून सही शिक्का घेऊन या व नगरला आल्यानंतर मला फोन करा. मी तेथे सही देते असा अजब सल्ला दिला. मात्र आठ दिवस उलटूनही ग्रामसेवकांनी टाळाटाळ केल्यानंतर पुन्हा दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता ग्रामसेवकांनी तुम्ही जुन्या ग्रामसेवकांची सही घ्या माझ्या हाताला इजा झाली आहे.
ग्रामसेवक सजेच्या ठिकाणी हजर नसतात. त्यामुळे अनेकदा कामे रखडली जातात. आम्ही काही कागदपत्रांची लेखी मागणी केली होती. मात्र ती आम्हाला दिली गेली नाहीत. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
-देविदास काळे, ग्रामस्थ.
त्यामुळे मला सही करता येणार नाही असा सल्ला दिला. दश्मीगव्हाण येथील ग्रामसेवक सजेच्या ठिकाणीही राहत नसल्याने नागरिकांनी अनेकदा तोंडी तक्रारही ग्रामपंचायत पदाधिकार्यांना दिल्या आहेत. मात्र याबाबत कुठलीही दखल घेतली न गेल्याने दश्मीगव्हाण ग्रामपंचायतचा कारभार राम भरोसे चालला असुन याबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, मी दश्मीगव्हाण येथील चार्ज सोडला असुन मला सही करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार तेथील ग्रामसेवकांचा आहे असे ग्रामसेवक भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले.
COMMENTS