मुंबई / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून राज्यभर आंदोलने पेटले आहेत. मनोज जरांगे हे त्यांचे उपोषण मागे न घेण्यावर ठाम आहेत. रा...
मुंबई / नगर सह्याद्री -
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून राज्यभर आंदोलने पेटले आहेत. मनोज जरांगे हे त्यांचे उपोषण मागे न घेण्यावर ठाम आहेत. राज्य सरकार देखील यावर निर्णय घेण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.
राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणावर नवा फॉर्म्युला सूचवला आहे. पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणले की, आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर 16 टक्के आरक्षण अधिक वाढवलं तर 50 टक्के अधिक 16 टक्के होऊन 66 टक्के होईल.
त्यात सर्व प्रश्न सुटतील. असा फॉर्म्युला शरद पवार यांनी सूचवला आहे. 50 टक्क्यांवर आरक्षण जाऊ नये ही गोष्ट खरी आहे. कोर्टाचा तसा निकाल आहे. पण तामिळनाडू सरकारने हे बंधंन 74 टक्के करून घेतलं आणि हे कोर्टात टिकलं, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधलं.
आता यावर सरकार हा फॉर्म्युला स्वीकरणार का? हे देखील पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
COMMENTS