पुणे / नगर सह्याद्री राष्ट्रवादी पक्षात बंड झालं अन अजित पवार भाजपसोबाबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील द...
पुणे / नगर सह्याद्री
राष्ट्रवादी पक्षात बंड झालं अन अजित पवार भाजपसोबाबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गट भारतीय निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत,
खरा पक्ष कोणता आहे आणि त्याच्याशी संबंधित कायद्याचे महत्त्वाचे प्रश्न याबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या बाबतची सुनावणी ६ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या बाबत निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल. पक्ष आणि चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसाठीची तयारी पूर्ण केली आहे.
सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला बोलवल आहे. त्यामुळे दोन्ही गट आपली बाजू कशी उजवी हे सांगण्याचा प्रयत्न करतील. पक्ष आणि चिन्ह ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय दोन्ही गटांना मान्य करावा लागणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
COMMENTS