विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून अनोखा उपक्रम निघोज | नगर सह्याद्री गेली आठ दिवसांत निघोज-आळकुटी जिल्हा परिषद गटांतील सहा हजार महिलांना शि...
विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून अनोखा उपक्रम
निघोज | नगर सह्याद्री
गेली आठ दिवसांत निघोज-आळकुटी जिल्हा परिषद गटांतील सहा हजार महिलांना शिर्डी, शनिशिंगणापूर येथील देवदर्शनाचा लाभ मिळाला असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली आहे. गटातील दहा गाड्यांमधून शुक्रवार दि. १५ रोजी ७०० महिलांना आज देवदर्शनासाठी पाठवण्यात आले. पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, सोसायटीच्या माजी अध्यक्षा मिराबाई वरखडे, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार, सोसायटीच्या संचालिका मनिषा वराळ, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ पाटील, स्कूल कमीटीचे अध्यक्ष किसनराव घोगरे, भाजपचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव हारदे, डिजिटल सामाजिक या संस्थेचे अध्यक्ष मंगेश वराळ, सामाजिक कार्यकर्ते नानापाटील वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, गोरख घोलप, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे, आपले गाव गणपती समाजसेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग, मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, कार्याध्यक्ष महेश ठाणगे,
विखे पाटील युवा मंचचे तालुका प्रवक्ते प्रतिक वरखडे, दत्तात्रय घोगरे, अॅड गणेश लाळगे, गंगादादा वरखडे, संतोष शेटे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे संपर्क कार्यालय व्यवस्थापक श्रीकांत पवार आदी उपस्थित होते. वराळ पाटील म्हणाले की, गेली आठ दिवसांत जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात गाड्या देवदर्शनासाठी पाठवण्यात आल्या होत्या. अतिशय आरामदायी अशा ९० बसेस मधून तब्बल सहा हजार महिलांची व्यवस्था करण्यात आली होती. नाष्टा, चहापाणी, जेवण अशा नियोजन असल्याने को.त्याही प्रकारची आडचण निर्माण न होता. दर्शनाचा लाभ झाला असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. गोरख घोलप, पांडूरंग उघडे, संदिप गेटम, मच्छिंद्र बेलोटे, राहुल बोरुडे, श्रीकांत पवार यांनी यावेळी अतिशय चांगले नियोजन करुन परिश्रम घेतले.
COMMENTS