शहरात गणपती उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे अवाहन; अभिजीत खोसे अहमदनगर | नगर सह्याद्री स्वस्तिक चौकातील राजयोग प्रतिष्ठान मित्र मंडळ ट्...
शहरात गणपती उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे अवाहन; अभिजीत खोसे
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्वस्तिक चौकातील राजयोग प्रतिष्ठान मित्र मंडळ ट्रस्टची गणेश उत्सवाच्या मंडप उभारण्याची रीतसर परवानगी घेतलेली असून या मंडळांनी दोन वर्षापासून येथे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. व येथे परास देखील उभारण्यात आलेली आहे.
अचानक निवडणुकीच्या काळात हरवलेला मंडळ शोध घेण्यासाठी निघालेले समदुखी कार्यकर्ते अथवा पदाधिकारी हे राजयोग प्रतिष्ठान मित्र मंडळाला मिळालेल्या परवानगी नाकारण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्तांना दबाव टाकत असून या दबावाला बळी न पडता रीतसर परवानगी असलेल्या मंडळाला परवानगी देण्यात यावी. समदुःखी मंडळाला त्याच चौकात दुसर्या ठिकाणी परवानगी द्यावी. गणपती सण उत्सव हा गुण्यागोविंदाने साजरा करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी केले.
शहरात कोणत्याच मंडळाला कोणाचाही विरोध नसताना देखील सर्वांची भावना असते की जास्तीत जास्त गणपती उत्सवात उत्सव साजरा होण्यासाठी सर्व एकत्र येतात. असे न होता या उत्सवाला गालगोट लावण्याच्या उद्देशाने काही ठराविक मंडळी महापालिका आयुक्तांना परवानगी संदर्भात दबाव टाकत आहे. मंडळाची परवानगी नाकारावी व कोणत्याही धार्मिक सण उत्सवाला विरोध करणारे हे या देवतांचा अपमान आहे. त्यामुळे या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करून समदुखी मंडळाच्या गटाने ज्या ज्या मंडळाच्या विरोधात परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.
त्यांना दिलेली परवानगी कायमस्वरूपी देण्यात यावी. कोणत्याही मंडळाच्या परवानग्या रद्द करू नये. गणपती उत्सव हा सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे, ऋषभ भंडारी, निलेश बांगरे, गजेंद्र दांगट, प्रवीण चव्हाण, सुनील आगरकर, सोनु घेंबुड, सदफ सय्यद, सतीश शिरसाठ, सागर डुमणे, अक्षय निकम, गोरख आगरकर, गिरीश गायकवाड, निलेश हिंगे, मळू गाडळकर, सुरज साठे, हर्षद बागवान, आदम बागवान, असलम शेख, राहुल चव्हाण आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS