छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. दोघांच्या कटूंबानी लग्नाला विरो...
छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. दोघांच्या कटूंबानी लग्नाला विरोध देर्शवल्याने एका प्रमीयुगलने गळफास घेत आपल्या जीवनाची यात्रा संपवलयाची धक्कादायक घटना घडली आहे.
मयत तरुणाचे नाव ऋषीकेश सुरेश राऊत (वय २४, रा. बीडकीन), तरुणीचे नाव दिपाली अशोक मरकड (वय २०, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिपाली बीए प्रथम वर्षात शिकत होती. ती तिच्या मामाकडे बीडकीन येथे राहत होती, तर ऋषीकश हा उच्च शिक्षित असून तो ग्राफिक्स डिझाइनर होता. दोघेही एका कॉलनीत राहत असल्याने, त्यांची ओळख झाली. यानंतर दोघे प्रेमात पडले. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला.
या विरोधानंतर दुचाकीने दोघे ही जण बीडकीनहून शहरात आले आणि रात्री एका हॉटेल मध्ये थांबले होते. दरम्यान सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हॉटेलचा एक रूम उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रूमची बेल वाजवली. रूममधून प्रतिसाद येत नव्हता. डॉवर लोक तोडल्यानंतर या रूममध्ये ऋषीकेश आणि दिपाली या दोघांनीही पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
दोघांचे मृतदेह घाटी रूग्णालयात पाठवण्यात आले. घाटीच्या डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
COMMENTS