मुंबई / नगर सह्याद्री : विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे पार पडत आहे. देशाचे लक्ष याकडे लागले आहे. कारण भाजपला रोखण्...
मुंबई / नगर सह्याद्री : विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे पार पडत आहे. देशाचे लक्ष याकडे लागले आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी कम्बर कसली आहे.
या बैठकीदरम्यान ‘इंडिया’ने १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे ते आपण याठिकाणी पाहुयात -
के. सी, वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)
एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)
संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)
तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)
अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)
राघव चढ्ढा (आपचे खासदार)
जावेद खान (समाजवादी पक्ष)
लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)
हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
डी राजा (सीपीआय)
ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)
मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर ‘सूडाचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘इंडिया’ची लोकप्रियता वाढत असल्याने सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तपास यंत्रणांचा दुरुपयोग करेल. नेत्यांना तुरुंगात टाकण्याआसाठी कूटनीती आखेल. परंतु आपल्याला भाजपाच्या हुकूमशाही राजवटीचा अंत करायचा आहे.
COMMENTS