श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून ‘आदित्य एल १’चे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरीकोटा | वृत्तसंस्था चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही ...
श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून ‘आदित्य एल १’चे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा | वृत्तसंस्था
चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ’आदित्य एल १’ उपग्रहाचे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी ११:५० मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून भारताने सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. काही दिवस आदित्य उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून, अंतराळात असणार्या एल-१ पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. याठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर आदित्य उपग्रहाला एल-१ पॉइंटभोवती असणार्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येईल. हे अंतराळयान लँग्रेज पॉइंट-१ वर सुमारे ४ महिन्यांनंतर पोहोचेल. या बिंदूवर ग्रहणाचा
COMMENTS