मुंबई/ नगर सह्याद्री सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झालाय. अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स...
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झालाय. अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सलग १४ व्या दिवशीही सुरु आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार? याची माहिती फडणवीसांनी दिली.
“सरकार, विरोधी पक्षाने मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. आजच्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की कोणत्या मार्गाने पुढे जाता येईल. मराठा समाज असेल किंवा विविध समाजाचे प्रश्न समोर येत आहेत.
मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतरही मराठा समाजच्या संघटनांच्या मागण्या आहेत. या सर्व मागण्यांचा नीट एकत्रित विचार करून यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा विचार केला जाईल”, असं फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “लोकशाहीत एखादं उपोषण करणं, प्रश्न लावून धरणं याला मान्यताच आहे. लोकशाहीची ती पद्धत आहे. परंतु, असे प्रश्न सोडवण्याकरता काय मार्ग काढता येईल यावर विचार करायला हवा. सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाचा विचार करावा लागतो.
आम्ही आरक्षण दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीवर टीकलं पाहिजे. नाहीतर आम्ही एखादा निर्णय घेतल्यास समाज म्हणेल की आमची फसवणूक केली. आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मला विश्वास आहे की सर्वांनी सकारात्मक विचार केला तर समाजाचं भलं होईल.”
COMMENTS