नगर सह्याद्री टीम समाजात अनेक प्रकारच्या घटना पाहायला मिळतात. यातील काही घटना मात्र डोकं सुन्न करणाऱ्या असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली ...
नगर सह्याद्री टीम
समाजात अनेक प्रकारच्या घटना पाहायला मिळतात. यातील काही घटना मात्र डोकं सुन्न करणाऱ्या असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. पुतण्याच्या प्रेमिकेसोबत काकाने लग्न केले. परंतु पुतण्याने नात्याने काकू असलेल्या प्रेयसीसोबत पलायन केले.
अधिक माहिती अशी की : 'तो' व 'ती' हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट शहरात राहतात. दोघांचेही एकमेकांवर मनापासून प्रेम. प्रेमाचे नटे लग्नबेडीत आडकावण्याचे त्यांनी ठरवले. परंतु 'तो' बेरोजगार असल्यामुळे 'ती'च्या आई-वडिलांनी लग्नासाठी नकार दिला.
त्यामुळे 'तो' कामाच्या शोधात नागपुरात आला. येथे त्याला मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी देखील मिळाली. जेव्हा 'तो' वर्षभरानंतर घरी आला त्याच्या ती'च्या कुटुंबियांनी तिचे लग्न 'त्याच्या' काकाशी लग्न ठरवले होते. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून 'तो' गप्प बसला.
मात्र, दोघांचेही प्रेमसंबंध कायम होते. त्याबाबत काका आणि कुटुंबीय अनभिज्ञ होते. यादरम्यान तिला दोन मुले झाली. परंतु 'तो' आणि 'ती' प्रेमात आकंठ बुडाल्याने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही चिठ्ठी लिहून पळ काढला.
जेव्हा काकाने ते पाहिले तेव्हा काकाच्या पायाखालची जमीन सरकली. दरम्यान भरोसा सेलने तिघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे समूपदेशन केले. अखेर 'त्याने' माघार घेतली व थेट गाव गाठण्याचा निर्णय घेतला. व काका-काकूंचा पुन्हा संसार थाटला.
COMMENTS