नागपूर / नगर सह्याद्री सध्या राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे, नोकरीच्या शोधार्थ असणारे विध्यार्थी संतप्त झाले आहेत. अजित पवारां...
नागपूर / नगर सह्याद्री
सध्या राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे, नोकरीच्या शोधार्थ असणारे विध्यार्थी संतप्त झाले आहेत. अजित पवारांचं 'ते' स्टेटमेंट आता वाद निर्माण करील कि काय असे वाटायला लागले आहे.
अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च हा प्रचंड असून इतक्या पगारात खासगी कंपनीमध्ये तीन-चार कर्मचारी दर्जेदार काम करू शकतात, असे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर विद्यार्थी मात्र संतप्त झाले आहेत.
एकीकडे आधीच राज्य शासनाने अनेक विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आधीच संतापाचे वातावरण आहे. आता त्यात अजित पवार असे म्हणाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शासकीय नोकर भरतीला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाला पुढच्या निवडणुकीत घरी बसवा, असे आव्हान ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
COMMENTS