अहमदनगर / नगर सह्याद्री सध्या अहमदनगर जिल्हयातील राजकारणात विविध रंग दिसत आहेत. अहमदनगर जिल्हयातील राजकारण हे नात्यागोत्याचे राजकारण आहे अ...
अहमदनगर / नगर सह्याद्री
सध्या अहमदनगर जिल्हयातील राजकारणात विविध रंग दिसत आहेत. अहमदनगर जिल्हयातील राजकारण हे नात्यागोत्याचे राजकारण आहे असे म्हटले जाते. आता या राजकरणात आणखी एक मोठी घडामोड घडणार आहे.
जिल्ह्यातील भाजप आमदाराचा एक ‘पॉवर फुल’ पुतण्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे बडे नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
आज (४ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता साजन पाचपुते ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.
शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
COMMENTS