पारनेर | नगर सह्याद्री आगामी लोकसभा व विधानसभा सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून पारनेर मध्य...
पारनेर | नगर सह्याद्री
आगामी लोकसभा व विधानसभा सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून पारनेर मध्ये भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे रविवार दि. ३ सप्टेंबरला प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींच्या हस्ते होणार कार्यालयाचे उद्घाटन असल्याची माहिती प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य तथा भाजपाच्या २२४ पारनेर-नगर मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख विश्वनाथदादा कोरडे यांच्या माध्यमातुन पारनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या भव्य अशा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असुन तालुक्याच्या ठिकाणी असणार्या या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांना सहकार्य करण्यासोबतच पक्षीय बांधणी मजबूत होणार आहे.
रविवार दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वा. प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस .विजय चौधरी यांच्या शुभहस्ते व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार असुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह मतदारसंघातील विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचेही विश्वनाथ कोरडे यांनी यावेळी सांगितले.
पारनेर शहराच्या नव्या पेठेतील साई कॉम्प्लेक्स समोर यावेळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असुन याठिकाणी विजय चौधरी, डॉ. सुजय विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष. दिलिप भालसिंग यांसह जिल्हा व तालुकास्तरीय भाजपाचे उपस्थित मान्यवर तालुक्यातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांविषयी मार्गदर्शन करणार असल्याचेही कोरडे यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS