अहमदनगर /नगर सहयाद्री अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सध्या राज्य पातळीवरील राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादीचे दोन गट, ...
अहमदनगर /नगर सहयाद्री
अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सध्या राज्य पातळीवरील राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादीचे दोन गट, शिवसेनेचे दोन गट, भाजप व इतर पक्ष अशी स्थिती आहे.
दरम्यान आता अहमनगर जिल्ह्यात राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.
त्यामुळे आता ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. असे झाले तर तर याचे अहमदनगर च्या राजकारणात देखील पाडसाद उमटतील. परंतु ही तर केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिलीये.
पण दुसरीकडे बबनराव घोलप समर्थकांनी काल शिवतीर्थावर शक्तीप्रदर्शन करत घोलप यांना शिर्डीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केलीये. व याच दरम्यान, बबनराव घोलप यांनी वचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची गुप्त चर्चा देखील आहे.
काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत नाराजीचा बॉम्ब फोडला होता. चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहेत.
मात्र, घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. व त्यातच घडलेल्या या सगळ्या घडामोडी तसेच शरद पवारांची भेट घेणे या गोष्टी पाहता आगामी राजकीय डावपेच कसे असतील हे येणारा काळच सांगेल.
COMMENTS