नगर सह्याद्री टीम : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे...
नगर सह्याद्री टीम : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे.
दरम्यान आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांनी आमचं नाव चिन्ह जाईल अस वाटतंय असं वक्तव्य केले आहे.
जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं तर त्यात वावग नाही. आमचं नाव चिन्ह जाईल अस वाटतंय असं ते म्हणालेत. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव व चिन्ह गेले. त्याचप्रमाणे जर आता वेळ आली तर शरद पवारांच्या गटाकडून देखील चिन्ह व पक्षाचे नाव जाईल असे वाटते कारण तसे वक्तव्य खुद्द जयंत पाटील यांनी केले आहे.
COMMENTS