पारनेर | नगर सह्याद्री पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील जवळपास ४९ कामांसाठी २५/१५ लेखाशिर्षच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील जवळपास ४९ कामांसाठी २५/१५ लेखाशिर्षच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना झुकते माप दिल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे.
या प्रमुख विकास कामांमध्ये अळकुटी येथे खंडोबा मंदीरा समोर सभामंडप बांधणे-१५ लक्ष, अळकुटी हनुमान मंदिरा समोर सभामंडप बांधणे. १५ लक्ष,भंडारी मळा येथे हनुमान मंदिरा समोर सभामंडप बांधणे १५ लक्ष, घोलप वस्ती येथे संत सावता महाराज मंदिर संरक्षण भिंत बांधणे १५ लक्ष, गव्हाळी वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.१५ लक्ष,दरोडी येथे चारंगेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे २५ लक्ष, निमगाव वाघा येथे संत व्यासपीठ परिसरात सामाजिक सभागृह बांधणे ५० लक्ष, ढवळपुरी (कोकणेवाडा) येथे बिरोबा मंदिरा समोर सभामंडप बांधणे १५ लक्ष, जवळा येथे धर्मनाथ महाराज मंदिरा समोर सभामंडप बांधणे. २५ लक्ष, वडनेर बुद्रुक येथे टेंभी मळा ते शिरापूर-वडनेर रस्ता करणे ३० लक्ष, गारगुंडी येथे गारगुंडी-गारगुंडी फाटा रस्ता करणे २५ लक्ष, भांडगाव येथे पिंपळाचा मळा रस्ता करणे २० लक्ष, वडगावगुंड ते देविभोयरे शिव रस्ता करणे.३० लक्ष, मोरवाडी येथे सावता महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधणे. २० लक्ष. भाळवणी येथे नागबेंद वाडी रस्ता-पांदड वस्ती रस्ता करणे २५ लक्ष, नेप्ती येथे बायपास रोड ते होळकर वस्ती जवळ नळकांडी पुलाचे बांधकाम करणे २५ लक्ष, पिंपळगाव रोठा येथे मज्जीत परिसर सुशोभिकरण करणे २० लक्ष, वासुंदे येथे गांगड मळा ते ठाकर वस्ती रस्ता करणे २० लक्ष, बाबुर्डी बेंद येथे फरशीच्या नदीवर नळकांडी पुलाचे बांधकाम करणे २० लक्ष, जामगाव येथे मळगंगा माता मंदिरासमोर सभामंडप बांधणे २५ लक्ष, माळकूप येथे नगर कल्याण हायवे ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता करणे ३० लक्ष, वारणवाडी येथे खंडोबा मंदिर सभामंडप बांधणे. २० लक्ष, भांडगाव येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे.१५ लक्ष आदींसी विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.
COMMENTS