मुंबई / नगर सह्याद्री महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडी आहेत. दरम्यान आज एका राजकीय घटनेने चर्चाना उधाण आले आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळान...
मुंबई / नगर सह्याद्री
महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडी आहेत. दरम्यान आज एका राजकीय घटनेने चर्चाना उधाण आले आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ राज्यपाल रमेश बैस यांकडे गेलं होत.
या घटनेने राजकीय चर्चांना उधाण आले. दरम्यान मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ही भेट होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली असल्याचे शिष्टमंडळातील अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
“जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात 1 तारखेला मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जचा आदेश नेमका कुणी दिला? मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिला? कुणीही स्वीकारत नाही. प्रशासनाने स्वत: हा एवढा मोठा निर्णय घेतला?
ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी आमच्या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्यपालांची भेट घेतली”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
COMMENTS