सुपा | नगर सह्याद्री नागरिकांच्या समस्या लक्षात घेता तालुयात मोठ्या प्रमाणावर सभामंडपासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. धार्मिक कार्यासाठी सर...
सुपा | नगर सह्याद्री
नागरिकांच्या समस्या लक्षात घेता तालुयात मोठ्या प्रमाणावर सभामंडपासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. धार्मिक कार्यासाठी सर्वांनी एकत्र रहा भविष्यात निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुयातील पिंपळनेर येधील श्री संत सेना महाराज मंदिराचा सुमारे १० लक्ष खर्चाचा सभामंडप लोकार्पण आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पिंपळनेर येथे तालुयातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोक सावंत होते. तर नगराध्यक्ष अर्जुन भालेकर, पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे, माजी सरपंच सुभाष गाजरे व पिंपळनेरचे माजी अध्यक्ष बबनराव आतकर, जेष्ठ कार्यकर्ते सोन्याबापू जाधव, माजी उपसरपंच राजेंद्र रासकर, माजी उपसरपंच गाजरे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव जाधव, अध्यक्ष भाऊ बीडे, उपाध्यक्ष शाम साळूंके, कार्याध्यक्ष नवनाथ राऊत, सचिव सुनील आतकर, माऊली कोरडे, विनायक कुटे, दिपक कार्ले, रघुनाथ कार्ले, विजू कार्ले, निलकंठ कोरडे, गणेश जाधव, विशाल करडे, अविनाश पंडित, संतोष वाघमारे, सचिन पंडित, प्रमोद सोनवने, अविनाश पंडित, दत्ता राऊत, अमित गायकवाड, निलेश पंडित, चंद्रकांत पप्पु कार्ले, रामेश्वर घायातडक, प्रसाद भोसले, कोरडे, दिपक शिंदे, नावनाथ कुटे, संजय काळे, राहुल कडवे, गणेश शिंदे, राम साळुंके, सागर वाघमारे, नाना राऊत, साहेबराव वाघमारे, धनु सोनवणे, दत्ता सोनवणे, पुजारी भाऊ सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तालुयातील गुणवंताचा सन्मान करण्यात आला. जिल्हा संघटक कानिफनाथ गायकवाड यांनी वडिलांच्या स्मरणार्थ तालुयात प्रथम येणार्या करंडी येथील प्रसाद आतकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला. तर नाभिक संघटना पारनेर आणि प्राचार्य कार्ले यांनी विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार लंके यांचे हस्ते केला. यावेळी आमदार लंके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षण घेताना कोणतीही अडचण आली तर मला तात्काळ संपर्क करा तीथे मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच धार्मिक कार्यासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही हि लंके यांनी दिली. मंदिराभोवती कंपाऊंड ची मागणी करताच तात्काळ कंपाऊंड चे काम सुरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले.
प्रवचनकार हभप यशवंत थोरात महाराज यांचे प्रवचन झाले. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करुन महाआरतीनंतर महाप्रसाद देवी भोयरे फाटा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष घायातडक, ओबोसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राऊत यांनी केले तर आभार स्वप्नील बिडे यांनी मानले.
COMMENTS