अहमदनगर / नगर सह्याद्री धान्य सफाईच्या दुकानातून धान्य चोरीला जाण्याची घटना घडली आहे. याप्रकणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. सदर घटना शहरात...
अहमदनगर / नगर सह्याद्री
धान्य सफाईच्या दुकानातून धान्य चोरीला जाण्याची घटना घडली आहे. याप्रकणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. सदर घटना शहरातील अमित नगर भागात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोरख चव्हाण यास ताब्यात घेतले आहे.
प्रकाश शांतीलाल भळगट असे फिर्यादीचे नाव आहे. अधिक माहिती अशी : प्रकाश शांतीलाल भळगट यांचे देवी रोड, अमित नगर, गणपती कारखान्या शेजारी एक दुकान आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास त्यांना त्यांची मुलगी तृप्ती दिपक शिंदे हिने फोन करून सांगितले की धान्य गोडाऊनच्या कम्पाउंडमध्ये कुणीतरी चोरी करत आहे.
पती दिपक शिंदे यांनी पोलिसांना कळवले असून पोलीस येत आहेत असे सांगितले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी वरील आरोपीस ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS