सोनाक्षी सिन्हाने वांद्रे येथील रंग शारदा सभागृहाजवळ 81 ओरेटमध्ये 4,200 चौरस फुटांचे घर विकत घेतले आहे. तिच्या या घराची किंमत 11 कोटी रुपये आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सोनाक्षीने मुंबईतीमध्ये नवीन घर घेतल्यामुळे ती चर्चेत आहे. सोनाक्षीनं मुंबईमध्ये आलिशान सी फेसिंग घर खरेदी केले आहे. सोनाक्षी सिन्हाने वांद्रे येथील रंग शारदा सभागृहाजवळ 81 ओरेटमध्ये 4,200 चौरस फुटांचे घर विकत घेतले आहे. तिच्या या घराची किंमत 11 कोटी रुपये आहे.
हे घर केसी रोड, वांद्रे येथील इमारतीच्या 26व्या मजल्यावर म्हणजेच टॉप फ्लॉरवर असून या घरासाठी सोनाक्षीनं 55 लाख रुपये भरले आहेत.सोनाक्षीच्या या नवीन घराचा लॉबी एरिया 348.43 स्क्वेअर फूट असून हेल्पर टॉयलेट आणि एअर हँडलिंग युनिटसाठीही या घरामध्येच जागा आहे. घराचा एकूण कार्पेट एरिया 4,210.87 चौरस फूट आहे.
तसेच चार कार पार्किंगची जागा देखील या घरासोबत सोनाक्षीला मिळणार आहे. माहीम खाडी आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृश्य देखील सोनाक्षीच्या या घरामधून दिसते. सोनाक्षी सिन्हा ही बडे मियाँ-छोटे मियाँ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिचा डबल एक्सएल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीप्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच तिची दहाड ही वेब सीरिज देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
या वेब सीरिजमधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केले असून तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मने जिंकले आहेत. सोनाक्षीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता झहीर इक्बालसोबत जोडलं जात आहे. परंतु त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती त्यांनी चाहत्यांना दिलेली नाही.
COMMENTS