अहमदनगर / नगर सह्याद्री मैत्रीच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. परंतु अहमदनगरमधील दोन मित्रांची कहाणी पाहून तुमचे डोळे मात्र नक्की पाण...
अहमदनगर / नगर सह्याद्री
एक मित्र शेतकरी, तर दुसरे माधुकरी मागून उपजिविका करणारे. मैत्री इतकी अतूट की, दररोज एकमेकांना भेटल्याविना दिवस जात नव्हता. एक होते राहाता तालुक्यातील केलवड येथील प्रगतिशील शेतकरी कै. रायभान नामदेव गमे व दुसरे मित्र होते कै. भाऊसाहेब ओमगिरी गोसावी.
दोघांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध. कै. गोसावीबाबा माधुकरी (भिक्षा) मागण्यासाठी गावात फिरत असत. त्यावेळी त्यांचे मित्र रायभान गमे हे त्यांना दररोज भेटत व त्यांच्या गप्पा रंगत. त्यांच्या गप्पांना वेळेचे भान नसायचे. त्यानंतर ते आपापल्या कामाला पुढे जात असत.
शनिवार दि. 2 सप्टेंबर रोजी यातील रायभान गमे यांचे वयाच्या 81 वर्षी सकाळी 7.15 वाजता निधन झाले. याच दिवशी सकाळी 8.55 वाजता दुसरे मित्र भाऊसाहेब गोसावीबाबा यांचेही वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. छोडेंगे दम मगर तेरा साथ ना तोडेंगे याची प्रचिती सर्वांना आली.
COMMENTS