सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील हंगा ग्रांमपचायतच्या जीम मधील साहित्य चोरणार्या दोघा चोरांना सुपा पोलिसांनी एका दिवसात अटक केली. न्या...
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील हंगा ग्रांमपचायतच्या जीम मधील साहित्य चोरणार्या दोघा चोरांना सुपा पोलिसांनी एका दिवसात अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत हंगा ग्रांमपचायतचे कर्मचारी भास्कर गायकवाड यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हंगा बस स्थानका जवळ हंगा ग्रांमपचायतची जीम (व्यायामशाळा) असुन मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर च्या रात्री ६ नंतर ते बुधवार दिनांक १३ सप्टेंबर च्या सकाळी ६ वाजन्याच्या अगोदर अज्ञात चोरट्यानी जीम खोलीचे सटर उघडून आतमधील व्यायामाचे साहित्य चोरुन नेले यामध्ये दहा हजार रुपये किं.चे १ बेंच प्रेस मशिन, दहा हजार रुपयांची स्मिथ मशीन, तीन हजारचे लोखंडी बार, एक हजाराचे डंबल्स, १५ हजाराचे लेट पुल, अकरा हजाराचे शोल्डर प्रेस मशिन असे ऐकून पन्नास हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले अशी फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दखल केला. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी बी. के. मासळकर, पो ना. संदीप पवार, यशवंत ठोबरे यांनी आरोपी मयुर भानुदास बर्डे व स्वप्निल दिलीप पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना शुक्रवारी पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
COMMENTS