औरंगाबाद / नगर सह्याद्री : मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक ठिकाणांवरून निषेध व्यक्त केला जात आ...
औरंगाबाद / नगर सह्याद्री :
मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक ठिकाणांवरून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आज विविध ठिकाणी अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येणार आहेत. राज ठाकरे औरंगाबादमधून कारने जालन्याकडे जायला निघाले होते.
यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं.
त्यानंतर पुन्हा दाभरूळ गावात मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली. पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावेळी त्यांनी माईकवरून आंदोलकांशी संवाद साधला.
दरम्यान, राज्यात आज ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
COMMENTS