औरंगाबाद / नगर सह्याद्री : जालन्यातील मराठा आंदोलकांच्या लाठीमाराच्या घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटत आहेत. मराठा समाजात संतापाची लाट नि...
औरंगाबाद / नगर सह्याद्री :
विविध राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला आहे. दरम्यान आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असं चुकीचं वातावरण निर्माण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय.
आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची थेट माफी मागितली. ते म्हणाले की, माझ्या आधीच्या सत्तेच्या काळात पाच हजार आंदोलने झाली.
तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झाले आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोषींवर कारवाई होणारच आहे. परंतु या घटनेचं राजकारण कुणी करत असेल तर ते योग्य नाही. जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असं चुकीचं वातावरण निर्माण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय.
COMMENTS