जालना / नगर सह्याद्री : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण राज्यात न...
जालना / नगर सह्याद्री :
आंदोलन शांततेत सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला? असा सवाल आंदोलक, राजकीय नेते करत आहेत. दरम्यान आता याबाबत अप्पर पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे. दगडफेक झाल्यानंतर वरिष्ठांनीच लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. .
खाडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पत्र आम्हाला डॉक्टरांनी दिले होते. त्याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले होते. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक घेऊन अंतरवाली सराटी येथे गेलो. आंदोलकांशी चर्चा सुरू असतानाच एका बाजूने गोंधळ उडाला.
त्यानंतर दगडफेक झाली. याची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी दिली.
COMMENTS