जळगाव। नगर सहयाद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन व...
जळगाव। नगर सहयाद्री -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी एस पाटील यांचा आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. जळगाव येथील आयोजित सभेत आमदार एकनाथ खडसे यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आमदार खडसे म्हणाले, गेल्या एक वर्षांपासून विविध पक्षांच्या सभा या मैदानात होत आहेत. मात्र यापूर्वी एवढी मोठी सभा झाली नव्हती. येवला बीडला सभा झाली, पण त्यापेक्षा अधिक उत्साह इथे जाणवत आहे. राज्यातील सरकार हे तिघांचं सरकार आहे, एक सिनियर एक ज्युनिय, दोन बायका फजिती ऐका, असं आहे.
अजित पवार जे बोलतात ते करणार नेते आहेत. मात्र आता आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. काय अवस्था केली. आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचीही सही घेतली जाते. तुमचा स्वाभिमान गेला कुठे? असा सवाल खडे यांनी अजित पवार यांना केला आहे.
COMMENTS