अहमदनगर / नगर सह्याद्री : Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. किरकोळ कारणातून दोन गटात तुफान 'राडा' झाल...
अहमदनगर / नगर सह्याद्री :
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. किरकोळ कारणातून दोन गटात तुफान 'राडा' झाला असल्याचे समजते. सदर घटना रामवाडी भागात रविवारी (दि. 10) रात्री घडली.
याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या सात जणांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आदित्य रशिद (वय 25 रा. रामवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश ससाणे, पप्पु पाटील व राधे राजपुत (सर्व रा. रामवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या गटाचे गणेश विलास ससाणे (वय 24 रा. रामवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख आदित्य रशिद (रा. रामवाडी) व अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रामवाडी भागात यापूर्वी दोन समाजाच्या गटात वाद होऊन दगडफेकीची घटना घडली आहे.
रविवारी रात्री वादाची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन गटातील सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS