संभाजी नगर / नगर सह्याद्री मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक होत आहे. महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत एकूण 75 निर्णय होणार अस...
संभाजी नगर / नगर सह्याद्री
मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक होत आहे. महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत एकूण 75 निर्णय होणार असल्याचे समजते. विशेषतः मराठवाड्यासाठी ही बैठक खास ठरणार आहे. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ दाखल झालं आहे.
परंतु या कॅबिनेटच्या बैठकीआधीच राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केलाय. राज्य सरकारने राज्यातील दोन जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे आणि गावाचे नाव आता धाराशिव असणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभाग आणि गावाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असणार असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठं गिफ्ट मिळालं आहे. या आधीही औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलं होतं. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर आता सरकारने राजपत्र प्रसिद्ध करून थेट अधिसूचनाच जारी केली आहे.
COMMENTS