अहमदनगर / नगर सह्याद्री कांदा उत्पादक शेतकऱ्यासांठी खुशखबर आहे. राज्य सरकारने सानुग्रह अनुदानाचा ठरवलेला पहिला हप्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
अहमदनगर / नगर सह्याद्री
कांदा उत्पादक शेतकऱ्यासांठी खुशखबर आहे. राज्य सरकारने सानुग्रह अनुदानाचा ठरवलेला पहिला हप्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीत बटन दाबून वितरित केला जाणार आहे.
प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये याप्रमाणे हे अनुदान जमा होणार आहे. तीन लाख शेतकर्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित केलं जाणार आहे. ज्या शेतकर्यानी ऑफलाईन अर्ज केले आहेत त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंत सर्वांना अनुदान जमा होईल. ज्या शेतकर्यांची 10 हजार रुपयांपर्यंतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे.
ज्या लाभार्थींचे देयक 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत, त्या लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.
COMMENTS