बंगळूर / नगर सह्याद्री कर्नाटक राज्यात ‘ऑपरेशन हस्त’ला वेग आला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सध्या जी रणन...
बंगळूर / नगर सह्याद्री
कर्नाटक राज्यात ‘ऑपरेशन हस्त’ला वेग आला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सध्या जी रणनिती आखली आहे ती भाजपचं टेन्शन वाढवणारी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या आमदार आणि माजी आमदारांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
उघडपणे कोणालाही काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले नसले, तरी भाजपचे आमदार, माजी आमदार आणि शिवकुमार यांची भेट उत्सुकता वाढविली आहे. शिवकुमार यांनी यापूर्वीच भाजप आमदार शिवराम हेब्बार आणि माजी खासदार शिवरामेगौडा यांची भेट घेतली आहे.
तसेच माजी आमदार पूर्णिमा श्रीनिवास यांच्या निवासस्थानी भेट दिली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधी पक्षनेते निवडीला झालेल्या विलंबाने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत.
मात्र भाजपचे नेतृत्व आपल्या आमदारांना रोखण्यात अपयशी ठरत आहे. असंतुष्ट आमदार, माजी आमदारांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या प्रयत्नाना वेग आला आहे. विशेषतः शिवकुमार स्वतः रिंगणात उतरले आहेत. ते स्वत: ‘ऑपरेशन हस्त’वर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
COMMENTS