मुंबई / नगर सह्याद्री मुंबईजवळील पवई याठिकाणी एअर होस्टेसचा भयाण अवस्थेत मृतदेह आढळला होता. परंतु आता तिच्या हत्येचा उलगडा झाला आहे. सफाई ...
मुंबई / नगर सह्याद्री
मुंबईजवळील पवई याठिकाणी एअर होस्टेसचा भयाण अवस्थेत मृतदेह आढळला होता. परंतु आता तिच्या हत्येचा उलगडा झाला आहे. सफाई कामगाराने शरीरसुखाच्या आशेने तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे.
सदर आरोपीस अटक केल्यानंतर चौकशीमध्ये हत्येचं कारण समोर आलं आहे. रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. रुपल ओगरे बहीण आणि मित्रासोबत मरोळ येथील एन जी कॉम्प्लेक्स येथे राहत होती.
मात्र दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. रविवारी रुपलने इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला क्लिनिंगसाठी घरी बोलावले होते. त्यावेळी रुपल घरात एकटी असल्याने आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
मात्र रुपलने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुपलने विरोध केला त्यावेळी आटवालने चाकून तिच्यावर वार केले. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.
COMMENTS