नगर सह्याद्री टीम जालन्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यभर मराठा समाज आक्रमक झाल...
नगर सह्याद्री टीम
जालन्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान आक्रमक झालेल्या मराठा समाजातील तरुणांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाच घेराव घातला.
हिंगोलीतील औंढा शहरात हा घेराव घातला. आंदोलकांवर लाठीमार का केला असा जाब यावेळी मंत्र्यांना विचारण्यात आला. दरम्यान राज्यभर आंदोलने सुरु आहेत. ठाण्यातही आंदोलन करण्यात आले.
येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा काय असेल याबाबत निर्णय घेतला. बीडमध्ये देखील मराठा बांधव आक्रमक झालेला आहे. संतप्त झालेल्या समाज बांधवानी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे.
हा सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गृह विभागाने घडवून आणला आहे. कारण आज पर्यंत मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेत पार पडले आहेत. कुठेही गालबोट लागलं नाही. मात्र काल गालबोट लावण्यात आले आहे. आमच्या मराठा भगिनींवर गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय. असा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.
COMMENTS