भोपाळ / नगर सह्याद्री मृत झालेला मुलगा आईच्या स्वप्नात येऊ लागला. आई, तूच मला मारलंस ना? असं वारंवार विचारू लागला. आई घाबरली. तिला घरातही ...
भोपाळ / नगर सह्याद्री
मृत झालेला मुलगा आईच्या स्वप्नात येऊ लागला. आई, तूच मला मारलंस ना? असं वारंवार विचारू लागला. आई घाबरली. तिला घरातही मृत मुलगा दिसू लागला तसा भास होऊ लागला. आई घावरली व तिने घरच्यांसमोर स्वतःच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. तिनं सांगितलेला घटनाक्रम ऐकून कुटुंबियांसोबतच पोलिसदेखील हादरले. अंगावर काटा आणणारी घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरची आहे.
थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तारामाई वसाहतीत ध्यान सिंह राठोड मध्य प्रदेश पोलीस दलात हवालदार आहेत. ध्यान सिंह यांचा विवाह २०१७ मध्ये भिंडमध्ये राहणाऱ्या ज्योती ठाकूर यांच्याशी झाला. त्यांनी सनी (वय सव्वा तीन वर्षे) आणि मोनू (दीड वर्षे) अशी दोन मुलं आहेत.
दिवसभर घरात बसून कंटाळा येत असल्यानं घराखाली दुकान उघडून द्या. माझा वेळ जाईल आणि घरात चार पैसे अधिकचे येतील असं ज्योतीनं पतीला सांगितलं. त्यानुसार ध्यान सिंह यांनी पत्नीचं ऐकलं व दुकान टाकलं. थोड्याच दिवसात तिने दुकान बंद करा असे सांगितले.
परंतु पतीने आहे ते साहित्य विकून टाकू मग बंद करू असे सांगितले. नेमके याच दरम्यान २८ एप्रिल २०२३ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांचा मुलगा जतिन उर्फ सनी छतावरुन पडला. उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात समजून घरचेही दुखी झाले. परंतु काही दिवसातच ज्योती घाबरुन राहू लागली. रात्री झोपेतून अचानक उठायची. दिवसागणिक तिची प्रकृती आणखी बिघडू लागली.
ज्योतीला रात्री स्वप्नात तिचा मृत मुलगा जतिन वारंवार दिसत होता. घरात जतीनचा आत्मा भटकत असल्याचा भास तिला व्हायला लागला. त्यामुळे तिनं पतीसमोर हत्येची कबुली दिली. रागाच्या भरात जतिनला छतावरुन ढकलल्याचं तिनं सांगितलं. परंतु तिच्या बोलण्यातून काही विरोधाभास दिसू लागला.
पोलीस असणाऱ्या पतीला वेगळाच संशय आला. त्याकडे काही पुरावा नव्हता. त्याने पत्नीचे गुन्ह्याची कबुली देतानाच बोलणे रेकॉर्डिंग केले. व गुन्हा दाखल केला. तेथे पोलिसी खाक्या दाखवताच तिने सगळं कबूल केलं. जतीनचा मृत्यू निव्वळ अपघात असल्याचं पती ध्यान सिंह आणि त्याच्या कुटुंबाला वाटत होतं.
पण प्रत्यक्षात त्याचा खून झाला होता आणि तो विवाहबाह्य संबंधातून झाला होता. ज्योतीचे तिचा शेजारी उदय इंदौलियाशी अवैध संबंध होते. २८ एप्रिलच्या संध्याकाळी ज्योतीच्या सासरी कौटुंबिक कार्यक्रम होता. ध्यान सिंह आणि कुटुंबीय नातेवाईकांच्या पाहुणचारात व्यग्र होते.
या दरम्यान रात्रीच्या सुमारास ज्योती तिचा प्रियकर उदयला भेटायला छतावर गेली होती. आईला छतावर जाताना पाहून सव्वा तीन वर्षांचा जतीनही पाठोपाठ गेला.
त्यानं आईला तिच्या प्रियकराच्या बाहुपाशात पाहिलं. जतीन ही गोष्ट घरात सांगेल आणि आपलं पितळ उघडं पडले याची भीती ज्योतीला वाटली. त्याच भीतीपोटी तिनं जतीनला छतावरुन फेकलं व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
COMMENTS