अहमदनगर / नगर सह्याद्री : माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा अतोनात छळ केल्याची घटना सावेडीमध्ये घडली आहे. शिल्पा सुरज वाकळे असे छ...
अहमदनगर / नगर सह्याद्री :
माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा अतोनात छळ केल्याची घटना सावेडीमध्ये घडली आहे. शिल्पा सुरज वाकळे असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या पतीसह सासू सासऱ्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यानुसार तिचे पती सुरज आबासाहेब वाकळे, सासरे आबासाहेब जगन्नाथ वाकळे, सासू उर्मिला आबासाहेब वाकळे (सर्व रा. सावेडी गाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की. शिल्पा वाकळे यांना सन 2021 मध्ये तिच्या पतीने हॉटेल रिन्यूव्हेशन साठी माहेरुन 15 लाख रुपये आणण्यास सांगितले. विवाहितेचे काका संदिप व आजोबा नारायण यांनी सदर पैसे सासरच्यांना दिले.
त्यानंतर कोरोना काळात सासू सासऱ्यांच्या इलाजासाठी पुन्हा माहेरून पैसे मागितले. यावेळी देखील ९० हजार देण्यात आले. परंतु पैशांची मागणी वारंवार होऊ लागली. बँक कर्ज मिटवण्यासाठी 50 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला सांगितले. परंतु यावेळी माहेरच्या लोकांनी इतके पैसे नसल्याने देण्यास नकार दिला.
याचा पती सुरज यास राग आल्याने विवाहितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मानसिक व शारीरीक छळ केला. त्यानंतर वेळोवेळी माहेरून बकेचे कर्ज भरण्यासाठी 50 लाख रुपये आणण्यासाठी पती, सासू सासरे यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली. पैसे आणले नाही तर मारून टाकण्याचीही धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS