अनंतनाग / नगर सह्याद्री जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अतिरेक्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलाने अतिरेक्यांना सळो की पळो केलं...
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अतिरेक्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलाने अतिरेक्यांना सळो की पळो केलं आहे. कोकरनाग जंगलात हे अतिरेकी लपले असून त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी
सुरक्षा दलाकडून ड्रोनद्वारे बॉम्ब वर्षाव सुरू आहे.
या हल्ल्यानंतर मात्र अतिरेक्यांची घाबरगुंडी उडालीय. अतिरेकी जीवमुठीत घेऊन पळताना दिसत आहेत. हे अतिरेकी जंगलातून पळताना दिसले. जोपर्यंत अतिरेक्यांचं नामोनिशना मिटत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्यांच भारतीय लष्कराने म्हटलं आहे. जंगलात अनेक अडचणी येत आहेत.
तरीही अतिरेक्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरु आहे. या सर्च ऑपरेशनमध्ये पोलीस दलासह पॅरा कमांडोही सहभागी झाले आहेत.
आज या सर्व अतिरेक्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाकडून या जंगलात अजून बॉम्ब वर्षा करण्याची शक्यता आहे. हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आहे. लष्कर कमांडर उजैर खान एका अतिरेक्यासोबत लपलेला असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू आहे. तो एक दुर्गम डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी काल रात्रभरही ऑपरेशन सुरू होतं.
COMMENTS