सुपा एमआयडीसीत विविध कामांसाठी १४२ कोटी मंजूर: युवा नेते राहुल शिंदे मुंबईत उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक| अग्निशमन दल, रस्ते, आंतरराष...
सुपा एमआयडीसीत विविध कामांसाठी १४२ कोटी मंजूर: युवा नेते राहुल शिंदे
मुंबईत उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक| अग्निशमन दल, रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाची कमान होणार
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील सुपा व म्हसणे फाटा या ठिकाणी औद्योगिक वसाहतीचा विस्तार दिवसेंदिवस वाढू लागला असून या ठिकाणी अग्निशमन दल उपलब्ध नसल्याने अग्निशमन केंद्रांसह इतर मुलभूत सोयी सुविधांसाठी ५० कोटी, जुना सुपा ते एमआयडीसी रस्त्यासाठी २५ कोटी, नवीन सुपा रस्त्यासाठी ६५ कोटी, सुपा औद्योगिक वसाहत येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कमानीसाठी अडीच कोटी असा एकुण १४२.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती युवा नेते राहुल शिंदे पाटील यांनी दिली आहे.
मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील राहुल शिंदे पाटील यांच्या सह अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वेणुगोपाल रेड्डी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ( ऑनलाईन) आदीच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळशेती महामंडळाची बैठक सह्याद्री अतिथिगृहावर पार पडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांसाठी स्वतंत्र एक खिडकी योजना
सुपा व म्हसणे फाटा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या व नवीन उद्योजक येऊ लागले असून त्यांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी अनेक शासकीय परवाना आवश्यकता असते. त्यामुळे नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या उद्योगांना उद्योजकांना ज्या अनेक परवानगी लागतात. या परवाण्यासाठी नगर येथे एक खिडकी सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिंदे योजना सुरू करण्यात येणार आहे
- युवा नेते राहुल शिंदे
या बैठकीमध्ये प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसह अधिकारी व कामगारांना मूलभूत सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी सुपा एमआयडीसीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलिस चौकीसह अग्निशमन केंद्राकरिता ५० कोटी अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच, नवीन एमआयडीसी साठी भव्य प्रवेशद्वार उभारणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांनी दिली.
सुपे येथील एमआयडीसीत कंपनी अधिकारी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्मचार्यांसाठी विश्रीमगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुपे व म्हसणे फाटा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी अधिकारी व कामगारांसाठी नगर, शिरूर व पारनेर येथून सुप्यासाठी सह्याद्री शटल बस सुरू करण्यात येणार आहे. नवीन एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस चौकीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, सुपे येथील नव्या व जुन्या एमआयडीसीतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
COMMENTS