पारनेर | नगर सह्याद्री तालुयात विखे पाटील द्वयींकडून अनेक विकासाची कामे मार्गी लागत असुन नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच...
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयात विखे पाटील द्वयींकडून अनेक विकासाची कामे मार्गी लागत असुन नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून तालुयातील विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम सभापतीचे माजी सभापती काशिनाथ दाते यांनी केले आहे.
तर विखे कुटुंबाने नेहमीच राजकीय सामाजिक ताकद दिली असून यापुढील काळात काम करत असताना विखे कुटुंबाच्या सहकार्याने तालुयात काम करणार आहे. पक्ष संघटने बरोबर विचारधारा महत्त्वाची आहे यापुढील काळातही समाजासाठीच काम करत राहणार आहे असे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते यांनी सारोळा अडवाई येथील विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी मत व्यक्त केले.
पारनेर तालुयातील सारोळा अडवाई ते भोयरे पठार या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण ३० लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन माजी सभापती काशिनाथ दाते व शिवसेना शिंदे गटाचे पारनेर तालुका अध्यक्ष विकास उर्फ बंडु रोहोकले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी करण्यात आले.
राजकीय जीवनाचा श्री गणेशा सारोळा अडवाईत; तालुकाध्यक्ष रोहकले
माझ्या राजकीय जीवनामध्ये सारोळा अडवाई गावाचे महत्व हे मोठे आहे. गावच्या विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. नामदार राधाकृष्ण विखे व खासदार सुजय दादा विखे यांच्या माध्यमातून विकास कामांना आता चांगली गती मिळाली आहे. सारोळा आडवाई सारख्या गावच्या विकासामध्ये निधी कमी पडू देणार नाही असे मत शिवसेना शिंदे गटाचे पारनेर तालुका अध्यक्ष विकास उर्फ बंडू रोहकले यांनी व्यक्त केले. तर माझ्या राजकीय जीवनाचा श्री गणेशा खर्या अर्थाने सारोळा अडवाई गावच्या सहकार्यानेच झाला आहे. त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना सारोळा अडवाई गावाला मी कधीही विसरणार नाही या गावच्या विकासासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहील असेही मत यावेळी विकास उर्फ बंडू रोहोकले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, अहमदनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, पारनेर तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुभाष दुधाडे, सुपा गावचे माजी उपसरपंच दत्ता नाना पवार, सरपंच परशुराम फंड, उपसरपंच कोमलताई महांडुळे, सारोळा अडवाई सेवा सोसायटी चेअरमन शंकर महांडुळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, बाबाजी महांडुळे, नाना फंड, आदित्य महांडुळे, संजय फंड, सौरभ महांडुळे, दिनेश महांडुळे, अंकुश शिंदे, मारुती महांडुळे, कलावंत शिंदे, डॉ. दत्तात्रय महांडुळे, अण्णासाहेब फंड, बबन फंड, बबन महांडुळे, भाऊसाहेब शिंदे, बन्सी महांडुळे, अंबादास महांडुळे, महेश शिंदे, सोन्याबापु महांडुळे, सुरेश शिंदे, शंकर महांडुळे, बापूसाहेब महांडुळे, भाऊसाहेब महांडुळे, आदी सारोळा अडवाई येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS