अहमदनगर / नगर सह्याद्री सफरचंद घ्यायला आलेल्या ग्राहकाने भाव कमी करण्यास सांगितला. याचा राग आल्याने फळविक्रेत्याने ग्राहकाच्या थेट डोक्यात...
अहमदनगर / नगर सह्याद्री
सफरचंद घ्यायला आलेल्या ग्राहकाने भाव कमी करण्यास सांगितला. याचा राग आल्याने फळविक्रेत्याने ग्राहकाच्या थेट डोक्यात कोयता टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना श्रीगोंद्यात घडली आहे. या
प्रकरणी पोलिसांनी अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान (सर्व रा. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेमदास उबाळे (रा. आढळगाव) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : प्रेमदास उबाळे हे श्रीगोंद्यात फळ खरेदीसाठी आले होते. अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान यांच्या दुकानात ते गेले होते. प्रेमदास यांनी फळविक्रेत्याला सफरचंद बारीक आहेत. भाव व्यवस्थित लावून दे असे सांगितले.
याचा राग आल्याने फळविक्रेत्या तिघांनी वाद सुरू करत यांना जिवंत सोडू नका रे असे म्हणत शिवीगाळ केली. फळविक्रेते जुबेर बागवान यांनी हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने ग्राहक प्रेमदास उबाळे यांचे डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.
COMMENTS